देवेंद्र फडणवीसांची ‘गुगली’ ही गुगली नाही तर ‘नो बॉल’ निघाला – महेश तपासे

मुंबई  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेली ‘गुगली’ ही गुगली नसून तो ‘नो बॉल’ आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (State Chief Spokesperson of NCP Mahesh Check) यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. पहाटेचा शपथविधी हा शरद पवारसाहेबांच्या मान्यतेने झाला अशा प्रकारची गुगली आज देवेंद्र फडणवीस यांनी टाकत नवा वाद निर्माण केला आहे. यावर महेश तपासे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकली खरी मात्र काही तासातच पवारसाहेबांनी दिलेल्या उत्तराने त्या गुगलीचा ‘नो बॉल’ झाला आहे असेही महेश तपासे म्हणाले. शिंदे – फडणवीस सरकारचा संविधानिक दर्जा अजून सिद्ध व्हायचा आहे. सुप्रीम कोर्टात याची सुनावणी होणार आहे. त्यातच राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले नव्हते हेही माहिती अधिकारात समोर आल्याने विद्यमान सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळेच आता नवीन वाद निर्माण करुन गुगली टाकण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.