‘भाजपचा कोणताही नेता विशेषत: आशिष शेलार महिलेबद्दल अभद्र शब्द वापरुच शकत नाहीत’

मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी महापौर रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल आमदार अँड अशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.

आशिष शेलार यांच्या वक्तव्यावरून आता राजकीय रणकंदन सुरु झाले आहे. किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जात जबाब नोंदवला. त्यानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे वरळी सिलिंडर ब्लास्ट प्रकरणावरुन सुरु झालेला हा वाद आता अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकरणावर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आशिष शेलार कोणत्याही महिलेचा अपमान कासू शकत नसल्याचे म्हंटले आहे. ‘भाजपचा कोणताही नेता विशेषत: आशिष शेलार महिलेबद्दल अभद्र शब्द वापरु शकत नाहीत. महापौरांबद्दल तर बिल्कुल नाही. काल आशिष शेलार यांच्या प्रेसचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकपणे बोलतात त्यामुळं त्यांना शांत करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किंवा आशिष शेलार महिलांबद्दल कोणतेही गैरशब्द वापरणार नाहीत,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आशिष शेलार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस दळाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. मी कोणत्याही महिलेचा, महापौरांचा अपमान केलेला नसताना दोन पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. भाजप या गोष्टींना दबणार नाही. हा आशिष शेलार तर झुकणार नाही. असा पवित्रा आशिष शेलार यांनी घेतला आहे.

नायर रुग्णालयात चार महिन्याच्या बाळाला उपचार का मिळाला नाही. त्या बाळाच्या वडिलांचा मृत्यू, आईचा मृत्यू का झाला? हे प्रश्न विचारत आहे. सत्य बाहेर येईलच, जी चौकशी करायची आहे ती करा सत्य बाहेर येईल, असं आशिष शेलार म्हणाले. यावर जी पावलं उचलली पाहिजेत ती मी उचलणार आहे, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

तर, आज मी कोणतही राजकीय भाष्य करणार नाही. खोटे गुन्हे दाखल करण्यास पळापळ सुरु आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मागचा बोलविता धनी कोण आहे, हे बाहेर काढणार असल्याचं आशिष शेलार म्हणाले.

हे देखील पहा