नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर नार्वेकरांचे खोचक ट्विट

मुंबई – शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी (santosh parab) भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांना सर्वोच्च न्यायालयातही (suprem court) दिलासा मिळाला नाही. येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही. शरण झाल्यानंतर नितेश राणे नियमित जामिनसाठी अर्ज करु शकतात.नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला.

दरम्यान, या न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेनेकडून आता प्रतिक्रिया आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी खोचक ट्वीट केले आहे. मिलिंद नार्वेकर कोणताही नामोल्लेख न करता ‘लघु सुक्ष्म दिलासा’ असे ट्वीट करत नितेश राणे यांना टोला लगावला आहे.