मेरा अब्दुल ऐसा नहीं है… श्रद्धा वालकर मर्डर प्रकरणी केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

नवी दिल्ली – दिल्लीच्या मेहरौली भागात एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर, मृतदेहाचे सुमारे 35 तुकडे 300 लिटर क्षमतेच्या रेफ्रिजरेटरमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवण्यात आले आणि एक एक करून ते राष्ट्रीय राजधानीच्या विविध भागात फेकण्यात आले. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) या २६ वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी सध्या दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) याला ताब्यात घेतले आहे. यानंतर या आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी सोशल मिडीयावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अशात आपल्या दिलखुलास आणि इतरांवर भेदक मारा करणाऱ्या वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिनेही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात?,’ अशी पोस्ट केतकी चितळेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर केली आहे.

तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काहींनी तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे. तर बहुतांश जणांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.