निवडणुकीदरम्यान दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी राजकीय पक्षांना डिजिटल टाइम व्हाउचर जारी करणार

नवी दिल्ली  : निवडणुकीदरम्यान आकाशवाणी आणि दूरदर्शनवर राजकीय पक्षांना दिले जाणारे वेळ आता ऑनलाइन होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने, राजकीय पक्षांद्वारे सरकारी मालकीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वापरासाठी विद्यमान योजनेत सुधारणा केली आहे.(Digital time vouchers will be issued to political parties for campaigning on TV and AIR during elections).

माहिती तंत्रज्ञान (IT) प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल टाइम व्हाउचर जारी करण्याची तरतूद सादर करून हे केले गेले आहे. या सुविधेमुळे, राजकीय पक्षांना निवडणुकीदरम्यान वेळेचे व्हाउचर मिळवण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी ECI/CEO कार्यालयात पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही. निवडणूक प्रक्रियेच्या सुधारणा, सर्व भागधारकांच्या सुलभतेसाठी, तसेच तंत्रज्ञानाची सुविधा घेण्यासाठी आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे.

तंत्रज्ञानातील प्रगती ओळखुन आयोग राजकीय पक्षांशी संवाद साधण्यासाठी आयटी आधारित पर्याय उपलब्ध करून देत आहे. अलीकडेच, आयोगाने निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांकडून आर्थिक खाती ऑनलाइन भरण्यासाठी एक वेब पोर्टलही सुरू केले आहे.