Nana Patole | सांगली जिल्हा काँग्रेसला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही

Nana Patole | लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनिया गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना व दुःख समजतो, तुमच्या भावनांचे चीज करू, काँग्रेसचे कुटुंब एकसंध राहिले पाहिजे, तुमच्या वेदनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु आता मशाल पेटवायची आहे. सांगली काँग्रेसला ज्यांनी द्रष्ट लावण्याचे काम केले त्याची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजची लढाई वेगळी आहे, देशावर मोठे संकट आहे, चुकून जर मोदी सरकार पुन्हा आले तर भविष्यात निवडणूक होणार नाही. मोदी सरकारने १० वर्षात विरोधी पक्षांना प्रचंड त्रास दिला. सोनियाजी गांधी यांना ईडी कार्यालयात तासंतास बसवले, राहुल गांधी यांनाही ईडी कार्यालयात चौकशीच्या नावाखाली पाच दिवस १०-१० तास बसवले अशा मोदी सरकारला माफ करणार आहात का? सोनिया गांधी यांनी देशासाठी कपाळाचे कुंकू दिले, देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी पंतप्रधानपदही नाकारले हे लक्षात ठेवले पाहिजे.

या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्ह्याचे निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच