धाराशिवच्या विकासासाठी अर्चनाताईंना निवडून आणा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

Dharashiv Loksabha: राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे अर्ज दाखल झाले आहे.  देशाच्या नेत्याच्या निवडीच्या या प्रक्रियेत स्थानिक मुद्द्यांनाही तेवढेच महत्व आहे, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून आपल्या भागाच्या विकासाला मदत हवी असेल तर देशात जे वारे वाजत आहे त्या मोदी विचारांचाच खासदार निवडून द्या असे आवाहन करत उमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी धाराशिवकरांना अर्चना पाटील (Archana Patil) यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

अजित पवार म्हणाले, देशामध्ये मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार येणार आहे. आपण मागे उजनीच पाणी आणलं होतं, पण ते आपल्यासाठी पुरेसे नाहीये, आता आपल्याला कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे पाणी आवश्यक आहे.  या राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी आठ वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. परंतु आपल्याला राज्य सरकारचा निधी कमी पडणार आहे त्यामुळे केंद्रातून निधी येणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या विचाराचा खासदार हा आपल्या भागातून लोकसभेत गेला पाहिजे.

अर्चना राणा पाटील ह्या महायुतीचा उमेदवार असून केंद्रातील सरकारच्या विचाराच्या उमेदवार आहेत मागच्या वेळेस आपण डॉक्टर पद्मसिंह पाटलांना निवडून दिलं होतं. मागे सासऱ्यांना निवडून दिलं होतं आता सुनेला निवडून द्या. चार दिवस सासूचे असतात आता सुनेचे दिवस आलेले आहेत. आपली घरची सून आहे, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा