लेकाच्या प्री-वेडिंगसाठी मुकेश अंबानींनी संपत्तीतील केवळ इतके टक्के केले खर्च, आकडा एकदा पाहाच

Mukesh Ambani: भारतातील सर्वात श्रीमंत बिझनेस टायकून आणि जगातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्न करणार आहे. 1 ते 3 मार्च या कालावधीत गुजरातमधील जामनगर येथे दोघांचा विवाहपूर्व सोहळा पार पडत आहे. प्री-वेडिंग फंक्शनमध्ये बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि बॉलीवूड सेलिब्रिटींसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा मेळावा होणार आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत-राधिकाच्या आलिशान प्री-वेडिंगसाठी (Anant-Radhika pre-Wedding) मुकेश अंबानींनी गडगंज पैसा खर्च केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मुकेश अंबानी आपला लहान मुलगा अनंतच्या लग्नावर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबाने प्री-वेडिंगसाठी तब्बल 1000 कोटी रुपये खर्च केले आहे. थक्क करणारी गोष्ट म्हणजे मुकेश आणि नीता अंबानी यांनी सर्वात लहान मुलाच्या प्री-वेडिंगसाठी जे पैसे खर्च केले आहेत, ते मुकेश अंबानी यांच्या संपूर्ण संपत्तीतील फक्त 0.1% आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड: Nana Patole

स्पेनमधून भारतात फिरायला आलेल्या विदेशी महिलेच्या तंबूत घुसून ८-१० जणांनी केलं नकोसं कृत्य

अंबानींचं लग्न पाकिस्तान लीग पेक्षा भारी? प्री-वेडिंग अटेंड करायला PSL सोडून आला दिग्गज खेळाडू