मातोश्रीवरील बैठकीत मोठा राडा, राऊत पडले एकटे, मीडियाशी न बोलताच गेले !

Mumbai – शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी मातोश्रीवर (Matoshree) झालेल्या बैठकीत एनडीएच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढील दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्याची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे संजय राऊत विरूद्ध इतर खासदार असा सामना रंगला. या बैठकीनंतर नाराज झालेले संजय राऊत माध्यमांशी न बोलता सामना कार्यालयकडे निघून गेले.

उद्धव ठाकरे (uddhav Thackery)यांच्या बैठकीमध्ये खासदार आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. सर्व खासदारांनी (shivsena mp) आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राऊत हे बैठकीनंतर कुणाशीही न बोलता बाहेर पडले. दरम्यान, आजच्या बैठकीला लोकसभेतील शिवसेनेच्या १२ खासदारांनी उपस्थिती लावली. तर सात खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.