Malhar Patil | ज्यांच्यामुळे खासदार झाला आता त्यांनाच म्हणतो कोण मोदी? मल्हार पाटलांची ओमराजेंवर टीका

Malhar Patil | ज्यांना देशाच्या प्रगतीची, समृद्धीची इच्छा आहे, ते फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. त्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून मागच्या वेळी धाराशिव मधून तुम्ही ‘त्या’ भंगार चोराला निवडून दिले. अन् हा आता म्हणतो कोण मोदी? खर तर मोदींमुळेच हा माणूस नाटकं करण्या ऐवजी लोकसभेत खासदार म्हणून गेला, अशी जहरी टीका महायुतीचे युवा नेता मल्हार पाटील (Malhar Patil) यांनी विद्यमान खासदार ओमाराजे निंबाळकर (Omaraje Nimbalkar) यांच्यावर नाव न घेता केली.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी उस्मानाबाद येथे आयोजित सभेत मल्हार पाटील बोलत होते. मल्हार पाटील म्हणाले, मागच्या वेळी येथील कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदीं साठी राणा जगजितसिंग पाटील म्हणजे माझ्या वडिलांच्या विरोधात प्रचार केला. मात्र, मोदींच्या नावाने निवडून आलेला उमेदवार आता म्हणतो, कोण मोदी? खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही लोकांनी 2019 मध्ये त्या सारख्या भंगार चोराला पण खासदार केलं. हे केवळ नरेंद्र भाई मोदीं यांच्या आशीर्वादामुळे. अन् तो आज मोदींच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच