Ranjeetsingh Naik Nimbalkar : करमाळ्यातील स्टार प्रचारकाने डोक्यावर काढले ‘कमळ’, अनोख्या प्रचाराची चर्चा

Ranjeetsingh Naik Nimbalkar : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडला. त्यानंतर २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे इतरांसह माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला. भाजपकडून  रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निबांळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारार्थ करमाळ्यातील एका प्रचारकाने अनोखा प्रचार करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

करमाळ्यातील एक स्टार प्रचारक गणेश जगताप यांनी आपल्या डोक्यावर कमळ चिन्ह काढून भाजपचा एक अनोखा प्रचार सुरू केला आहे. हा एक गरीब घराण्यातील मजूर कामगार असून परिस्थिती मोदी सरकारमुळे सुधारेल या हिशोबाने कमळ चिन्हाचा प्रचार करत आहे. गणेश जगताप यांनी आपल्या डोक्याच्या मागील बाजूस कमळाच्या आकाराचा हेयरकट केला आहे. त्यांच्या या अनोख्या प्रचाराची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका