कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची भन्नाट कामगिरी; अंडर-14 चॅम्पियनशीपमध्ये एकमेव भारतीय

नवी दिल्ली :  कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव  हीनं (Aishwarya Jadhav) भारताचा तिरंगा लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बलडन (Wimbledon) स्पर्धेमध्ये डौलानं फडकवलाय. अंडर-14 चॅम्पियनशीपमध्ये निवड झालेली ऐश्वर्या एकमेव भारतीय आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऐश्वर्याचा जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या ऍण्ड्रीया सोरानं पराभव केला.

पहिल्या सामन्यात पराभव झाला असला तरी ऐश्वर्याच्या हातात आणखी दोन सामने आहेत. राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये ऐश्वर्यानं हे दोन्ही सामने जिंकले तर तिला पुढच्या राऊंडमध्ये जायचा मार्ग सोपा होऊ शकतो. दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय टेनिस असोसिएशन म्हणजेच एआयटीएफने 14 वर्षांखालच्या मुलींची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जागतिक खेळाडूही सहभागी झाले होते. या स्पर्धेत ऐश्वर्याने चार मॅच जिंकून सेमी फायनलमध्ये धडक मारली होती, पण तिला फायनल खेळता आली नाही. या कामगिरीच्या जोरावर ऐश्वर्याची विम्बलडनसाठी निवड झाली.