उद्या जर सत्ता परिवर्तन झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, संजय राऊत यांची भविष्यवाणी

मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत दुफळी पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. 16 आमदार हे अपात्र ठरणार आहे. त्यांच्यावर 10 व्या सुचीनुसार ही कारवाई होणार हे जवळपास स्पष्ट आहे. आजही काही आमदार आमच्या संपर्कात आहे, उद्या जर सत्ता परिवर्तन झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे. तसंच, शिंदे गटातील आमदार संपर्कात असल्याचा दावाही केला आहे. 16 आमदार हे अपात्र ठरणार आहे. त्यांच्यावर 10 व्या सुचीनुसार ही कारवाई होणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्या बंडखोर आमदारांना आपला बचाव करण्यासाठी कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावे लागणार आहे. मग ते स्वत: शिवसैनिक (Shiv Sainik) कशाला म्हणता. अशा वेळी किती आमदार मानसिक दृष्टा किती तयार आहे, हे पाहावे लागणार आहे. आमदार आमच्या संपर्कामध्ये आहे. आणि भविष्यामध्ये सत्ता परिवर्तन झाले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असं राऊत म्हणाले.