Sunetra Pawar | दौंड तालुक्यातूनही सुनेत्रा पवार यांना मोठा प्रतिसाद; दौंडमध्ये महायुतीचे नेते एकवटले

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील खडकी येथून सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच दौंड तालुक्यात संयुक्त दौरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच प्रमुख एकवटले आहेत. आम्ही प्रमुखच आता एकत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल असा विश्वास माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केला. तर महायुतीत आम्ही सर्वांनी एकत्रित पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भुमिका घेवून सुनेत्रा पवार यांना अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी यावेळी केले.

देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणुक आहे. विकासाला महत्व देणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले. महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होत असताना आपणही त्यात सामील होवून विकासरथात सहभागी होवून घड्याळाला अधिकाधिक मतदान करावे असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ