Shirur LokSabha | शिवाजीदादांचे मताधिक्य वाढवण्यासाठी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वाघोलीत नियोजन बैठक

शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदार संघातील महायुतीचे उमेदवार  शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalarao Patil) यांना शिरूर – हवेली मतदार संघातून मोठे मताधिक्क्य मिळवून देण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. मनसैनिकांच्या पाठिंब्यामुळे माझी ताकद वाढली असून, राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे तरूणांची ताकद प्राप्त होणार असल्याचे आढळराव पाटील यांनी नमूद केले.

मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर व हवेली तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वाघोली येथे झालेल्या नियोजन बैठकीत आढळराव पाटील यांना मोठे मताधिक्क्य मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी मनसेचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, उपाध्यक्ष महिबूब सय्यद, काका गायकवाड, किरण गव्हाणे,  सविता दरेकर, ॲड. राहुल कदम, शिरूर तालुकाध्यक्ष तेजस यादव, अविनाश घोगरे, वींद्र गुळादे, हवेली तालुकाध्यक्ष चेतन चौधरी, शिरूर शहर अध्यक्ष ॲड. आदित्य मैड, सचिव रवीराज लेंडे, संतोष नरके, सुनिल दरेकर, धर्मा गावडे आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या नियोजन बैठकीत, आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मनसेच्या वतीने संपर्क मोहिम हाती घेण्यात आली असून, शिरूर – हवेलीत (Shirur LokSabha) घर टू घर प्रचाराचे नियोजन करण्यात आल्याचे रामदास दरेकर यांनी सांगितले.

मनसेच्या पाठिंब्यामुळे महायुतीला बळ येणार असल्याचे आढळराव पाटील यांनी नमूद केले. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी संसदेत प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. राज ठाकरे हे तरूणांच्या गळ्यातील ताईत असून, त्यांच्या पाठिंब्याचा महायुतीला मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ