डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन ला राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मानित..!

सातारा : डिजिटल मिडिया संपादक(Digital Media Editor) पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पहिले राज्यस्तरीय अधिवेशन व राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्कार पुस्तकांच गाव भिलार, महाबळेश्वर सातारा येथे आयोजित केला होता.

या महागौरव पुरस्कार मध्ये संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब सहकार्याने डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई ,मंत्री दिपक केसरकर तसेच खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार मंगेश चिवटे व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन टीम यांनी स्वीकारला. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना अध्यक्ष मा.राजा माने सर व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन टीम उपस्थित होते.