ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी घेऊन येत आहेत एक नवीन सोशल प्लॅटफॉर्म! 

नवी दिल्ली –  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची (Twitter) कमान आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क (Elon Musk) यांच्या हातात आहे. त्यांनी शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार पूर्ण केला. अशा परिस्थितीत ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) आता एक नवीन सोशल प्लॅटफॉर्म आणण्याच्या तयारीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये ट्विटरचे सीईओ पद सोडले. सहा महिन्यांनंतर ते संचालक मंडळातूनही बाहेर पडले.

या सगळ्यानंतर डोर्सी आता ब्लूस्की सोशल या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे आपले लक्ष वळवत आहे. दरम्यान, या डीलनंतर त्यांनी सर्वप्रथम मायक्रोब्लॉगिंग साइटचे सीईओ पराग अग्रवाल आणि मुख्य वित्त अधिकारी नेड सेगल यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचवेळी मस्कचे एक ट्विटही या डीलनंतर चर्चेत आहे. मस्कने ट्विट करून लिहिले, ‘द बर्ड इज फ्री’ (पक्षी मुक्त आहे).