मी 25 वर्षांपासून पत्रकारितेत आहे, मला नीतिमत्ता शिकण्यासाठी कोणाचीही गरज नाही- चौरासिया

नवी दिल्ली- न्यूज नेशनचे अँकर दीपक चौरसिया त्यांच्या एका लाइव्ह शोमध्ये तोतरे आवाजात अस्ताव्यस्तपणे बोलताना दिसले होते. विशेष म्हणजे CDS बिपीन रावत यांच्या जागी त्यांनी चक्क व्हीके सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. हे कृत्य टेलिव्हिजनवर लाइव्ह अस्वीकार्य आहे, परंतु जेव्हा भारतीय सशस्त्र दलाच्या 13 शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली जात असेल तेव्हा हे कृत्य अक्षम्य गुन्हा आहे असं म्हणत अनेकांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आता चौरासिया यांनी याबाबत एक खुलासा केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तुम्ही माझ्याबद्दल केली त्यासाठी मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. पण आता मला वाटतं की मी काही गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत.व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांना जे वाटत आहे ते संपूर्ण सत्य नाही.

खरं तर माझ्या घरी लग्न होतं आणि मिरवणुकीत जास्त नाचल्यामुळे माझ्या गुडघ्याची जुनी दुखापत होऊ लागली. ज्या मुद्द्यावर शो चालू होता तो मुद्दा मला सोडायचा नव्हता आणि त्यामुळे शो पूर्णपणे ठीक व्हावा म्हणून मी पेन किलर खाल्ल्या. मी तुम्हाला सांगतो की माझ्या गुडघ्यात हेअरलाइन फ्रॅक्चर आहे.माझी चूक होती की पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने दुष्परिणाम होतात, मला हे माहित नव्हते. त्यामुळे पेनकिलर घेतल्यावर माझा त्रास कमी होण्याऐवजी वाढला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर विविध गोष्टी करण्यात आल्या, ज्यात तथ्य नाही. मी 25 वर्षांपासून पत्रकारितेत आहे. म्हणूनच पत्रकारितेची नीतिमत्ता शिकण्यासाठी मला कोणाचीही गरज नाही.मी माझ्या चाहत्यांची मनापासून माफी मागतो. तसेच, गेल्या तीन दिवसांपासून माझी चिंता व्यक्त करणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील हितचिंतकांचा मी आभारी आहे. तुमचे प्रेम आणि सहकार्य असेच मिळत राहील. हीच आशा. असं स्पष्टीकरण चौरासिया यांनी दिले आहे.