दारूच्या नशेत साइनबोर्डवर चढला, मग मारु लागला पुश अप्स; पुढे पठ्ठ्याचं काय झालं पाहाच

Viral Video: दारू माणसाला काय करायला लावेल, याचा अंदाज लावता येत नाही. सोशल मीडियावर तुम्ही अनेक असे व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये दारूच्या नशेत लोक भल्याभल्या गोष्टी करताना दिसतात. अगदी दारूच्या नशेत सांडशी भिडलेल्या बहाद्दरचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता असाच काहीसा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक व्यक्ती साइनबोर्डच्या मध्यभागी जाऊन योगासने करत आहे. त्यानंतर तो पुशअप्स करायला लागतो. दरम्यान, खाली उपस्थित असलेले लोक आपली वाहने थांबवून त्याच्याकडे पाहू लागतात. तर काही वाहने खालून जात असतात. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ ओडिशातील संबलपूरमध्ये रेकॉर्ड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकांनी शेअर केला आहे. यावर लोक खूप कमेंट करत आहेत. या मद्यधुंद व्यक्तीबद्दल अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे, तर काही लोकांचे म्हणणे आहे की, अशा निष्काळजीपणाबद्दल त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. अधिकारी आल्यानंतर या व्यक्तीचे काय झाले, अशी विचारणा काही लोकांनी केली.