बारा वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात परतलेल्या जयदेव उनाडकटला ‘या’ आयपीएल संघाने घेतले विकत

IPL Auction Live: भारताचा ३१ वर्षीय गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) हा भारतीय संघाकडून पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी तरसत होता. अखेर १२ वर्षांनंतर बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. एकीकडे भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर दुसरीकडे आयपीएल २०२३च्या मिनी लिलावातूनही (IPL 2023 Mini Auction) उनाडकटसाठी आनंदाची बातमी आली आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्स संघाने विकत घेतले आहे.

५० लाख या मूळ किंमतीत तो आगामी हंगामासाठी लखनऊ सुपरजायंट्सचा भाग बनला आहे. उनाडकटने आयपीएलमध्ये ९१ सामने खेळले आहेत. उनाडकटबरोबरच इशांत शर्मालाही दिल्ली कॅपिटल्सने ५० लाख रुपयांचा विकत घेतले आहे.(Jaydev Unadkat is bought by Lucknow Super Giants for Rs 50 Lakh)>

दरम्यान या लिलावात सर्व १० फ्रँचायझींनी मिळून सुमारे ४०५ खेळाडूंवर बोली लावल्या. त्यांपैकी २७३ भारतीय, १३२ परदेशी आणि ४ खेळाडू असोसिएट देशांचे होते. नेहमीप्रमाणे यंदाही लिलावात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. मिनी लिलाव असला तरीही, बऱ्याचशा खेळाडूंवर अनपेक्षित बोली लागल्या. त्यातही इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याने सर्व विक्रम मोडले. त्याला विकत घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जपासून ते मुंबई इंडियन्सपर्यंत बऱ्याचशा संघांमध्ये जय्यत स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर १८.५० कोटींच्या विक्रमतोड बोलीसह पंबाज किंग्जने त्याला विकत घेतले आणि तो लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.