शाळेतूनच सुरु होते धर्मांतरासाठी प्रयत्न; ६ जणांना अटक

भोपाळ – भोपाळमध्ये लोकांना धर्मांतराचे (Conversion) आमिष दाखविल्याची घटना समोर आली आहे. बैरागढच्या क्राइस्ट मेमोरियल स्कूलमध्ये हिंदू तरुण-तरुणींना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर (Conversion by luring Hindu youth) करण्यात येत होते. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून शाळाचालकासह ६ जणांना अटक केली.

घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही ‘येशू’च्या आश्रयाने आलात तर तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील, असे सांगून येथे लोकांचे ब्रेनवॉश (Brainwash For Conversion) केले जात होते. हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन झाल्यामुळे त्यांची गरिबीही दूर होईल, असेही त्यांना सांगितले जात होते. या घटनेनंतर भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, पोलिस शाळांमधील धर्मांतराच्या हालचालींवर लक्ष ठेवतील.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैरागढ येथील स्थानिक रहिवासी महेंद्र उर्फ विकी नाथ याने दुपारी क्राइस्ट मेमोरियल स्कूलमध्ये (Crest Memorial School) धर्म परिवर्तनाची तक्रार केली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांना मोठ्या संख्येने हिंदू मुले-मुली येशूची प्रार्थना करताना आढळून आली. येथे आरोपींपैकी एक राजेश मालवीय त्याच्या 23 वर्षांच्या मुलीसह लोकांना हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास सांगत होता. या प्रकरणी मध्य प्रदेश धर्म परिवर्तन कायद्याच्या कलम 3/5 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.