जालन्यातील लाठीचार्जवेळी पोलीस अधिक्षक असलेले तुषार दोषी यांची पुण्यात बदली म्हणजे मराठ्यांना मारल्याचे बक्षीस ? 

Tushar Doshi : जालना येथील अंतरवाली सराटी (Jalna Protest)  येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण  लागले होते. यानंतर सातत्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे नाव चर्चेत आहे. सोमवारी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली.

त्यावर आता  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange)  निशाणा साधला आहे. आंदोलकांना मारल्याचे त्यांना बक्षीस मिळाले आहे .निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेईन. त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. मात्र यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही अशी प्रतिक्रिया दोशी यांच्या बदलीनंतर मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे.

जालनातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. त्यामुळे लाठीचार्ज करणारी  व्यक्ती कोण त्याचा शोध मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले  आहे.ते कल्याण मध्ये सकल मराठा समाजाच्या सभेत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली