भारतामधील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली; २२२.८८ मिलियन टन सोन्याचं भांडार

पटना – बिहारमधल्या जमुई जिल्ह्यात भारतामधील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली असून. या खाणीतून सोनं बाहेर काढण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. खाणकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या बिहार सरकारनं दिल्या आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, जमुई जिल्ह्यात २२२.८८ मिलियन टन सोन्याचं भांडार आहे.(Largest gold mine )

जमुईच्या जमिनीतून सोनं काढण्यासाठी खाण आणि भूवैज्ञानिक विभाग आणि राष्ट्रीय खनिज विकास निगमसह आणखी काही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत. जीएसआयला मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे.(Gold reserves of 222.88 million tonnes)

जमुई जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आणि सोनो या भागांमध्ये सोनं असल्याची माहिती मिळाली आहे, असं अतिरिक्त मुख्य सचिव आणि खाण आयुक्त हरज्योत कौर बम्हरा यांनी दिली. पुढील महिन्याभरात प्राथमिक राज्य सरकार सोन्याचा प्राथमिक शोध सुरू करेल. त्यासाठी एका केंद्रीय संस्थेशी आणि अन्य संस्थांशी सामंजस्य करार केले जातील.=