चुकीला माफी नाही; याकूब मेमन प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

मुंबई – दहशतवादी याकूब मेमनच्या (Terrorist Yakub Memon) कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या गंभीर प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. भाजप आणि शिंदे गट (BJP and Shinde group) महाविकास आघाडीवर अक्षरशः तुटून पडला आहे तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देखील या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर देत आहे.

दरम्यान, याकूब मेमन प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते फडणवीसांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी याविषयावर जास्त बोलणे टाळले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे चुकीचे आहे त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.