“कोणतीही सवलत, आरक्षण नसताना…”, लेक वैमानिक बनल्याने शरद पोंक्षेची छाती अभिमानाने फुगली

Mumbai: २१व्या शतकात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. अगदी आता शेअर मार्केटमध्येही मुली गुंतवणूक करत भरघोस यश प्राप्त करताना दिसत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या मुलीनेही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. शरद पोंक्षे यांची लाडकी मुलगी सिद्धी पोंक्षे (Siddhi Ponkshe) हिचे वैमानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. स्वत: शरद पोंक्षे यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या मुलीच्या यशप्राप्तीची माहिती दिली आहे.

सिद्धी वैमानिक होण्याचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती. त्यावेळी वडील शरद पोंक्षे यांनी सिद्धी परदेशात शिकण्यासाठी जात असताना विमानतळावरचे काही फोटो शेअर करत तिच्यासाठी एक भावूक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं लिहिलं होतं. आता तिचं ते स्वप्न पूर्ण झालं आहे, असं लिहिलं होतं.

नुकतीच ती एका प्रायव्हेट विमानाची पायलट झाली. ही आनंदाची बातमी सांगताना शरद पोंक्षे यांची छाती जणू अभिमानाने भरून आली होती. कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत. कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का?आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा, अशी पोस्ट केली आहे.