“धार्मिक विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला, कुणी शुद्राने…”, किरण मानेंनी राम मंदिर उद्घाटनाबद्दल केलेली पोस्ट चर्चेत

Kiran Mane Post About Ram Mandir Inauguration: भगवान श्रीरामाची नगरी असलेल्या अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणार्‍या प्रभू श्रीरामाच्या अभिषेकाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोठमोठ्या हस्ती या विशेष सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र शंकराचार्यांनी राम मंदिराचे काम अजून पूर्ण झाले नसल्याने त्यावर बहिष्कार टाकला आहे. या बहिष्कारासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे, जी चर्चेत आहे.

“राममंदिर उद्घाटन सोहळा अनेक गोष्टींची पोलखोल करणारा ठरलाय यात शंका नाही. जरा खोलात जाऊन सांगतो भावांनो. ज्या शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटनावर बहिष्कार टाकलाय… त्यातले एक शंकराचार्य निश्चलानन्द सरस्वती महाराज यांनी मागे उघडपणे सांगितले होते की, ‘मनुस्मृती हे जगातलं पहिलं आणि एकमेव संविधान आहे.’ ओके. ठीकै.

आता या बहिष्काराचं कारण शोधण्यासाठी मी मनुस्मृती वाचली. त्यातल्या काही नियमांकडं माझं लक्ष गेलं… मनुस्मृतीच्या चौथ्या अध्यायात स्पष्टपणे सांगीतले आहे की, ‘धार्मिक विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आहे. त्याव्यतिरीक्त कुणी शुद्राने ते करू नये. शुद्राला ते सांगूही नयेत. अन्यथा नरक भोगावे लागते.’ मी विचार करू लागलो, हे तर कारण नसेल शंकराचार्यांच्या बहिष्काराचे???

दुसरं म्हणजे, पौष महिना म्हणे हिंदू धर्मात धार्मिक कार्यांसाठी अशुभ मानला जातो. त्या अंगाने पहायचं ठरवलं तर… याच चौथ्या अध्यायात मनुने हे ही स्पष्ट सांगितले आहे की, ‘धार्मिक कार्यात डामडौल, दिखाऊपणा करणारे, मुहुर्ताचे बंधन न पाळणारे हे सर्व नरकवासाच्या शिक्षेला पात्र आहेत.’
हे ही कारण असेल कदाचित. असो.

एकंदरीत राममंदिराचा सोहळा मनुस्मृतीला कोलून होत आहे, त्यामुळे ही नाराजी आहे, असे सध्या तरी वाटतेय. नाही का? राजकीय फायद्यासाठी हे चाललंय असे धर्मगुरूंचे मत आहे. आता तुम्ही म्हणाल ते आपापसात बघून घेतील, हे सगळं इस्कटून सांगायचं कारण काय? तर माझ्या भावाबहिणींनो, आता मनुवाद्यांचे हिंदुत्व आणि राजकिय हिंदुत्व यात उडालेली ठिणगी आपण बारकाईनं बघण्याची योग्य वेळ आहे… म्हणजेच वारकरी संप्रदायाने सांगीतलेला, छत्रपती शिवरायांनी जपलेला, प्रबोधनकार ठाकरेंनी उलगडलेला आपला खरा मानवतावादी हिंदू धर्म लखलखून उजळलेला दिसेल. मनुस्मृती जाळून बुद्धांच्या मार्गावर गेलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरही मनाच्या तळापासून कळतील आणि बुद्धीला पटतील…जय शिवराय जय भीम,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?