Gram Panchayat Election : राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक जाहीर

Gram Panchayat Election : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचपदांच्या पोटनिवणुकांसाठी येत्या 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (State Election Commissioner U. P. S. Madan)  यांनी काल मुंबईत केली.

संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात कालपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी 23 ऑक्टोबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर असून, त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचंही वाटप करण्यात येईल.

5 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल आणि मतमोजणी 6 नोव्हेंबरला होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी साडेसात ते दुपारी 3 पर्यंत मतदानाची वेळ आहे. तिथं, 7 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

https://www.youtube.com/watch?v=gCfxHtR26Wo

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil