AAP खासदार संजय सिंह यांना ED ने दीर्घ चौकशीनंतर अटक केली

Sanjay Singh Arrested By ED: आपचे खासदार संजय सिंग यांना बुधवारी (४ ऑक्टोबर) ईडीने अटक केली. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आज पहाटे छापे टाकण्यास सुरुवात केली होती.’आप’ने संजय सिंह यांच्यावरील कारवाईला राजकीय म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) म्हणाले की, निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि पोलिस यासारख्या सर्व एजन्सी सक्रिय होतील. काल पत्रकारांच्या घरावर आणि आज संजय सिंह यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. असे अनेक छापे टाकले जातील, पण घाबरण्याचे कारण नाही.असे म्हणत केजरीवाल यांनी हल्लाबोल केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=gCfxHtR26Wo

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil