‘त्या’ व्हिडीओनंतर देखील सोमय्या झाले पुन्हा सक्रीय; आता सर्वात आधी करणार ‘हे’ काम

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे सध्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. हा व्हिडिओ पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून त्यांना खिंडीत पकडण्याचा देखील प्रयत्न सुरु केला आहे मात्र त्यात त्यांना म्हणावे तेवढे यश येताना दिसत नाहीये.

एका बाजूला हा मुद्दा चर्चेत असताना सोमय्या हे काहीसे शांत बसतील असा अंदाज लावला जात होता मात्र विरोधकांना धक्का देण्यासाठी सोमय्या हे पुन्हा सज्ज झाले आहेत. या व्हिडीओच्या मुद्द्याचा कोणताही परिणाम आपल्या कामकाजावर झाला नसल्याचे ते आपल्या कृतीतून दाखवत आहेत.

यातच आता सोमय्या पुन्हा सक्रीय झाले असून आपल्या कामाचा पुन्हा धडाका सुरु केला आहे. नेपच्यून डेव्हलपर्सच्या RAMRAJYA रामराज्य आंबिवली कल्याण प्रकल्पाच्या पीडित affected घर खरेदीदारांच्या संदर्भात आम्ही गृहनिर्माण मंत्रालय, वित्त मंत्रालय, रिझर्व्ह बँक, पोलीस आणि इतरांना भेटणार आहोत.अशी घोषणा सोमय्या यांनी केली आहे. या प्रकरणात आता कोण गोत्यात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.