गोव्यात आमचं डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू – संजय राऊत

मुंबई – गोव्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी खा. संजय राऊतांना आणि शिवसेनेला ओपन चॅलेंज दिलंय. गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाटलं तरी मी संजय राऊत सांगतील तिथे चहा आणि जेवण देईल”, असं आव्हानच आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.

यावर बोलताना आता खासदार संजय राऊत प्रत्युत्तर दिले आहे. १९८९ पासून भाजपा गोव्यात काम करतोय आणि सलग दोन निवडणुकात त्यांचं डिपॉझिट गेलं होतं. डिपॉझिट गेलं म्हणून निवडणुका लढायच्याच नाहीत, असं काही निवडणूक आयोगाने म्हटलेलं नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, पक्षाचा विस्तार करायचा आहे. गोव्या सारख्या राज्यात पक्ष वाढवण्यासाठी अशा निवडणुका लढाव्या लागतात. पण यावेळी तर चित्र वेगळं आहे.

पुढे ते म्हणाले, डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे. हा मराठा साम्राज्याचा एक मंत्र आहे. पानीपतावर देखील दत्ताजी शिंदे हे घायाळ होऊन पडले आणि शेवटपर्यंत म्हणत होते की बचेंगे तो और लढेंगे आणि आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही जर तुमच्या सारखे भ्रष्ट, माफिया, व्यभिचारी, धनदांडगे यांना जर तिकीटं दिली असती तर आम्ही कधीच सत्तेत आलो असतो. पण आम्ही आमचं, बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं चारित्र्य कायम ठेवलं.