Atul Benke | जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे, आमदार बेनकेंचा कोल्हेंवर अप्रत्यक्ष निशाणा

Atul Benke | शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढलराव पाटील यांनी जुन्नर गावभेट दौऱ्या दरम्यान पिंपळगाव सिद्धनाथला भेट दिली. यावेळी गावातील पदाधिकाऱ्यांनी फेटा बांधून औक्षण करून आत्मिय स्वागत केले. तसेच त्यांची बैलगाडीतून रॅली काढण्यात आली. यावेळी जेसीबीतून दोन्ही बाजूला फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर श्री समर्थ मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आपल्याला असा खासदार निवडून देण्याची गरज आहे जो आपले प्रश्न दिल्लीत मांडेल. आणि दिल्लीतून निधी आणून आपल्याला मतदार संघाचा विकास करेल, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले.

जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके (Atul Benke) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून आपण प्रचार दौरा सुरू केला याचा अभिमान आहे. विद्यमान खासदार यांच्या जनतेबद्दल बिलकुल तळमळ नव्हती, जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे. शाश्वतीने काम करणारा व्यक्ती पाहिजे. ते व्यक्ती आहे शिवाजीराव आढळराव पाटील आता आपल्या तालुक्याला दादांची गरज आहे. धरणातील पाणी नदीला कमी पडू देणार नाही असा शब्द देतो.

या प्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाप्रमुख भाजपा संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, पिंपळगाव सरपंच विक्रम खंडागळे, उपसरपंच उज्वलाताई खंडागळे, गोळेगाव सरपंच सुनीताताई मोदे, उपसरपंच हर्षल जाधव, कुमशेत सरपंच रवीशेठ डोके, उपसरपंच निर्मलाताई डोके, अलदरे सरपंच सविताताई सरजने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच