Indonesia: स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार उसळला, 129 जणांचा मृत्यू

Indonesia: इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात १२९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडोनेशियन पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.(Indonesia: Violence erupts during football match at stadium, 129 dead)

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार ही घटना पूर्व जावा येथील आहे. वृत्तसंस्थेनुसार, पूर्व जावा येथील एका फुटबॉल मैदानावर फुटबॉलचा सामना सुरू होता. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावर पोहोचले होते. फुटबॉल सामन्याचा निकाल येताच मैदानात सामना पाहण्यासाठी आलेले चाहते संतप्त झाले. संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानात घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.(Indonesia Football Match Tragedy)

संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानात घुसून मारामारी सुरू केली. सर्वत्र गोंधळ माजला होता. पूर्व जावा पोलिसांचे प्रमुख निको एफिंटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसक घटनेत 34 जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. ईस्ट जावा पोलिसांचे प्रमुख निको एफिंटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित लोकांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.