पाळणा हलला : प्रियांका आणि निक जोनसच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

नवी दिल्ली : प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. तिने आणि तिचा पती निक जोनसने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आहे. प्रियंका आणि निकचे हे पहिलेच अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे. आता प्रियांका आणि निकवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

प्रियांकाने स्वतः चाहत्यांना खुशखबर दिली आहे. प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, हे सांगताना खूप आनंद होत आहे की आम्ही सरोगसीच्या माध्यमातून मुलाचे स्वागत केले आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आम्ही तुम्हाला या विशेष काळात गोपनीयतेसाठी आदरपूर्वक आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद. निक जोनासनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या खास प्रसंगी प्रियांका आणि निक जोनासचे बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी अभिनंदन करत आहेत.

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान प्रियांकाने पती निक जोनाससोबत संसार वाढवण्याचे संकेत दिले होते. तिने एका मासिकाशी केलेल्या संभाषणात सांगितले होते की, भविष्यात मूल माझ्या आणि निकच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असेल आणि जेव्हा मी कुटुंबासोबत पुढे जाण्याचा विचार करेन, तेव्हा मला आयुष्यात थोडे हळू पुढे जायला आवडेल. मात्र, ती इतक्या लवकर आई होईल, असे कोणालाच वाटले नव्हते.

2018 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले

प्रियांका चोप्राने 1 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमध्ये निक जोनासशी हिंदू आणि नंतर ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. लग्नाआधी दोघांनी एकमेकांना खूप दिवस डेट केले होते. यानंतर दोघांनी आपले नाते पुढे नेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर प्रियांका चोप्रा बहुतेक वेळ पती निकसोबत अमेरिकेत राहते.