Manohar Joshi Passed Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे निकटवर्तीय मनोहर जोशी यांचे निधन

Manohar Joshi Passed Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज पहाटे 3.02 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्षही राहिले आहेत. सकाळी 11 ते 2 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा रुपारेल महाविद्यालयाजवळील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. ते बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते, त्यामुळे गेल्या वर्षी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी आणि इतर कुटुंबीयांसह रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. जोशी हे 1995 ते 1999 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि अविभाजित शिवसेनेचे राज्याचे मुख्यमंत्री बनणारे ते पहिले नेते होते. 2002 ते 2004 या काळात केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये ते खासदार आणि लोकसभेचे अध्यक्षपदही भूषवले होते.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार