‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Mumbai Indians, IPL 2024 Schedule: 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. म्हणजेच आजपासून बरोबर एक महिन्यानंतर आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दोन दिवसांनंतर म्हणजेच 24 मार्चला होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या संघाचा कर्णधार असेल. विशेष म्हणजे हार्दिक सलामीचा सामना त्याच्याच ‘फेव्हरेट फ्रँचायझी’ म्हणजेच जुनी टीम गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. शुभमन गिल गुजरात संघाचे नेतृत्व करेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

आतापर्यंत फक्त पहिल्या 21 सामन्यांचे आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या 21 सामन्यांदरम्यान मुंबई इंडियन्स एकूण चार सामने खेळणार आहेत. हार्दिक पांड्याचा संघ 27 मार्चला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. प्रतिस्पर्धी संघाच्या घरी पहिले दोन सामने खेळल्यानंतर, मुंबई इंडियन्स त्यांच्या घरच्या म्हणजे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या वेळापत्रकानुसार उर्वरित दोन सामने खेळेल. मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. मुंबईचा संघ 7 एप्रिलला दुपारी साडेतीनपासून सामना खेळणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

मनोज जरांगे हेकेखोर, त्याला काडीची अक्कल नाही; जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप

‘व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!’

Maratha Reservation ने महायुती सरकारचा पारदर्शी प्रामाणिकपणा सिद्ध! भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन