Salman Khan House Firing | गृहमंत्री, मुख्यमंत्री कुठे गेलेत, कायदा-सुव्यवस्था कुठेय? सलमानच्या घराबाहेर गोळीबाराच्या घटनेवरून शिवसेनेचा सवाल

Salman Khan House Firing | बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चार राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. पहाटे 4.50 च्या सुमारास दोन अज्ञातांनी हा हवाई गोळीबार केला. दोन्ही शूटर दुचाकीवरून आले आणि चार राऊंड गोळीबार करून तेथून पळ काढला. सध्या तरी कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. पोलिसांनी सलमान खानच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. या घटनेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी प्रतिक्रिया दिली. सलमान (Salman Khan House Firing) खान असो किंवा कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती, मुंबई आणि महाराष्ट्रात सध्या कोणालाच सुरक्षित वाटत नाहीये, असं ते म्हणाले.

“मुंबईत नुकताच गोळीबार झाला होता आणि डोंबिवलीतही आमदारावर गोळीबार झाल्याची घटना घडली. आज सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला. कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे? गृहमंत्री, मुख्यमंत्री.. तुम्ही कुठे आहात? गुन्हेगार बेधडकपणे रस्त्यावर फिरत आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी”, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखेसह वांद्रे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमही तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. डीसीपीही घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडातील निवासस्थानावरही हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर त्याचे सलमान खानशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जात होते, त्यामुळे हा हल्ला करण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल