शरद पवारांच्या पक्षाला मिळाले नवे निवडणूक चिन्ह, निवडणूक आयोगाची घोषणा

NCP Sharadchandra Pawar Party Symbol: शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून नवीन निवडणूक चिन्ह मिळाले आहे. नवीन चिन्हात एक व्यक्ती ‘तुतारी’ वाजवताना दिसत आहे. पक्षाचे नवे चिन्ह मिळाल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सोशल मीडिया पोस्टद्वारे तुतारी पक्षचिन्हावर प्रतिक्रिया देताना पक्षाने म्हटले की, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”

दरम्यान ६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घोषित केले होते. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह ‘घड्याळ’ अजित पवार गटाला दिले होते. शरद पवार गटाने पक्षासाठी तीन नावे निवडणूक आयोगाला दिली होती. यातून निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ हे नाव निश्चित केले. त्यावेळी निवडणूक आयोगाने पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय दिला नव्हता. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने आठवडाभरात चिन्ह वाटप करावे, असे आदेश न्यायालयाने १९ फेब्रुवारी रोजी दिले होते. ज्यानंतर आता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार