वर्षांचा शेवट होणार जोरदार, 10 मोठ्या कंपन्यांचे IPO बाजारात येणार

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मोठे चढ- उतार पाहायला मिळत आहे. अनेक मोठ्या कंपन्याचे आयपीओ बाजारात येणार आहे. यामुळे शेअर बाजारात ज्यांना पैसे गुंतवायचे आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. नोव्हेंबर महिन्यांमध्ये देखील अनेक नवीन आयपीओ बाजारात आले होते.

काही आयपीओनी धुमाकूळ घातला तर काही आयपीओनी मात्र निराशा केली. राकेश झुंझुणवाला यांचा स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स आणि तेगा इंडस्ट्रीजचे आयपीओची नोंदणी सुरू झाली आहे.गुंतवणूकदारांसाठी हे आयपीओ आता खुले झाले आहेत.

डिसेंबरमध्ये पर्यटन आणि सेवा देणाऱ्या कंपन्या त्यांचे आयपीओ आणणार आहेत. यामध्ये रेटगेन असो किंवा आनंद राठी यांचा वेल्थ हे सर्वाधिक चर्चेत असणारे आयपीओ आहेत.आनंद राठी वेल्थ लिमिटेड हा मुंबईतील आनंद राठी यांच्या उद्योग समूहाचा भाग आहे.

रेट गेनचा एक हजार 335 कोटींचा आयपीओ 7 ते 9 डिसेंबर दरम्यान लोकांसाठी खुला होणार आहे. या बरोबरच ग्लोबल हेल्थ, जी मेदांता ब्रॅंड अंतर्गत हॉस्पिटल चेन चालवते, मेड प्लस यासारखे आयपीओ देखील येणार आहेत. मेट्रो ब्रॅंड , श्रीराम प्रॉपर्टी, एजी एस यांचे देखील आयपीओ येणार आहेत.

व्हीएलसीसी यांचे आयपीओ देखील रांगेत आहेत.आयपीओच्या माध्यमातून मोठा निधी उभा केला जातो. त्यामुळे व्यवसाय वाढण्यास मदत होते. काही आयपीओ हे ऑफर फॉर सेल या अंतर्गत देखील विक्रीस येणार आहेत.

या संपूर्ण वर्षांचा विचार करता यावर्षी तब्बल 51 कंपन्यानी त्यांचे आयपीओ बाजारात आणले होते. यातून एक लाख कोटी रुपये उभारले गेले आहेत. अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.