Udayanraje Bhosale | अखेर ठरले… साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी

Udayanraje Bhosale | सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर महायुतीने उमेदवार दिला आहे. साताऱ्यातून भाजपाने पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध ते लढणार आहे.

भाजपच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार
भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेसाठी मंगळवारी बारावी यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांचे नाव आहे.

नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जागेचे नाव अजून नाही. भाजपच्या यादीत पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांची नावे त्यात आहे. उदयनराजे भोसले आता १८ एप्रिल रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज घेतला होता. भाजपकडून बंडखोरी होऊ नये म्हणून शेवटच्या क्षणी उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर करण्यात आले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Sharad Pawar : शरद पवारांची सारवासारव; सुनेत्रा पवारांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले…

Sunetra Pawar | रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, धायरीत जंगी स्वागत