Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

धैर्यशील मोहिते-पाटील (Mohite Patil) यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षबदलावरुन धैर्यशील मोहिते-पाटील यांना टोला लगावला आहे.

“मोहिते-पाटील कुटुंबाला अगोदरच अधोगती लागली आहे. पण, भाजपबरोबर गेल्यानं कुठंतरी बूस्टर मोहिते-पाटलांना मिळाला होता. आता तो बूस्टरही राहणार नाही. मोहिते-पाटलांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली असेच म्हणावे लागेल”, असा घणाघात उमेश पाटील यांनी केला.

उमेश पाटील म्हणाले, “मोहिते-पाटील (Mohite Patil) स्वार्थी आणि मतलबी असल्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळालं. सत्ता पाहून वेगवेगळ्या पातळीवर स्वत:चा बचाव करणं, अडचणी दूर करणं, निधी आणि संरक्षण मिळवण्यासाठी मोहिते-पाटील भाजपबरोबर आले होते.”

“विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबद्दल ( Vijaysingh Mohite Patil ) सोलापूर जिल्ह्याला आदर आहे. पण, बाळसिंह मोहिते-पाटील यांच्या मुलाचा विजय चौकातून ग्रामपंचायतीला पराभव होतो. एवढी दुर्दैव परिस्थिती मोहिते-पाटलांच्या पुढील पिढीनं आणली आहे. मोहिते-पाटलांची दर्पोक्ती संध्याकाळी सातनंतरच असते. त्यामुळे दिवसा मोहिते-पाटील काही बोलले, तर गांभीर्यानं घेण्याची गरज नाही,” अशा शब्दांत उमेश पाटलांनी खिल्ली उडवली आहे.

“मोहिते-पाटलांच्या हातात जिल्ह्याचं आणि विधानसभेचं राजकारण राहिलं नाही. तालुक्यापुरते ते मर्यादित झाले आहेत. उत्तमराव जानकरांची ( Uttam Jankar ) साथ मिळाल्यानं लोकसभेला रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना एक लाखांचं लीड देऊ शकले. पण, उत्तमराव जानकर विधानसभेला राम सातपुतेंच्या विरोधात उभे होते. तेव्हा, राम सातपुतेंना फक्त दोन हजारांचं लीड मोहिते-पाटील देऊ शकले. यांची ताकद सगळ्यांना माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटील सोडले, तर एकही नेता शरद पवार यांच्याबरोबर राहिला नाही,” असंही उमेश पाटलांनी म्हटलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol: “बोलायला गेलो तर खुप काही निघेल, परंतु…,” सुप्रिया सुळेंना मोहोळांनी दिलं प्रत्युत्तर

मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी! भाजपाच्या संकल्पपत्रावर मुरलीअण्णांची प्रतिक्रिया

Sharad Pawar: आश्वासनाची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य, शरद पवारांचा घणाघात