Sharad Pawar | शशिकांत शिंदे यांचा विजय होणार, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Sharad Pawar | शशिकांत शिंदे यांचा विजय होणार, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Sharad Pawar | साताऱ्यातील मायबाप जनतेने ‘तुतारी’ हाती घेतली असून ही अलोट गर्दी आणि सह्याद्रीच्या योध्याला मिळणारा हा प्रतिसाद म्हणजे विजयाची साक्ष आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

सातारा लोकसभा मतदारसंघात आमचे नाणे खणखणीत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) साहेब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदार हे कायम आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. येथील मतदार हे पुरोगामी विचारांचे असल्याचा दावा शरद पवार साहेब यांनी केला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे विजयी होतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शरद पवार म्हणाले की, साताऱ्याचं वैशिष्ट्य आहे की, सातारा नेहमीच पुरोगामी विचारांना पाठिंबा देणार आहे. स्वातंत्र्यांनातर अनेक नाव घेता येतील. कर्तृत्ववान लोकांची फळी होऊन गेली आहे. यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण आणि यशवंतराव मोहित अशी कर्तुत्ववान लोकांची एक प्रचंड कोण दिली आहे. या सर्वांच्या विचाराचा परगा आजही या जिल्ह्यातील लोकांवर आहे. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, आज देशांमध्ये जे घडत आहे. त्याला पर्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पर्याय देण्याकरिता आम्ही इंडिया आघाडीच्या मार्फत देण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. याला प्रतिसाद देण्याकरिता सातारा जिल्हा अग्रस्थानी आहे. आज उमेदवारी दाखल करण्याचा कार्यक्रम व्यतिरिक्त दुसरा कोणताही कार्यक्रम नव्हता. उमेदवारी दाखल करण्याकरिता निघालेल्या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला होता. यातूनच स्पष्ट होत आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे याची सुरुवात साताऱ्यातून होणार आहे असे शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार साहेब साताऱ्यात दाखल झाले होते. या रॅलीचे स्वरूप भव्यदिव्य असावं यासाठी खास रथाची सोय करण्यात आलेली होती. महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Sharad Pawar : शरद पवारांची सारवासारव; सुनेत्रा पवारांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले…

Sunetra Pawar | रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, धायरीत जंगी स्वागत

Previous Post
Udayanraje Bhosale | अखेर ठरले… साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी

Udayanraje Bhosale | अखेर ठरले… साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी

Next Post
Dinesh Karthik | 35 चेंडूत 83 धावा, दिनेश कार्तिकबाबत रोहितची भविष्यवाणी खरी ठरणार! टी20 विश्वचषकाचा प्रबळ दावेदार

Dinesh Karthik | 35 चेंडूत 83 धावा, दिनेश कार्तिकबाबत रोहितची भविष्यवाणी खरी ठरणार! टी20 विश्वचषकाचा प्रबळ दावेदार

Related Posts
फडणवीस - मलिक

संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती जेलमध्ये असताना पदावर राहणं योग्य नाही – फडणवीस 

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक…
Read More
optical-illusion-picture

९९% लोकांना  वाटते की हे चित्रात समुद्रात फिरणारे जहाज आहे पण तुम्हाला तरी ते काय आहे हे समजले का?

Pune –  सेलिंग शिप optical-illusion-picture असे ऑप्टिकल भ्रम आहेत जे मनाला गोंधळात टाकतात जेणेकरून लोक त्यात अडकतात. सध्या…
Read More