सर्वाधिक स्पर्धा आणि मानसिक ताण राजकारणामध्ये; श्रीकांत शिंदेंनी कुणाला मारला टोला

Indian Doctors Olympic: कोविड महामारीच्या संकटानंतर शारीरिक आणि मानसिक तंदरूस्तीचे महत्व सर्वांनाच पटले असून स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली सर्वांनीच आत्मसात करण्याची गरज आहे. डॉक्टरांनीच आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांमुळे एक सकारात्मक संदेश समाजाला मिळत असल्याची भावना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Shinde) यांनी व्यक्त केली. यंग डॉक्टर्सं लीग (वायडीएल) यांच्या तर्फे आयोजित देशातील पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्धघाटनप्रसंगी ते बोलत होते.

या स्पर्धेचे उद्धघाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून आमदार आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक खेळाडू निखील कानेटकर, राष्ट्रीय टेनिसपटून संदीप किर्तने, सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे रवि साकळकर आणि मनीष वाधवा, ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ (आयडीएल) समितीचे अध्यक्ष डॉ. नचिकेत महींद्रकर आणि सचिव डॉ. अमित द्रविड, डॉ. चिन्मय सराफ, डॉ. सुयोग गुरव आदि मान्यवर उपस्थित होते.

डॉ. शिंदे म्हणाले की, डॉक्टर नेहमीच सर्वांना औषधे लिहून देतात आणि रूग्णांना व्यायाम करा, असा सल्ला देतात. डॉक्टरांची जीवन अतियश व्यग्र असते. त्यातून वेळ काढून स्वतः व्यायाम करणे त्यांना शक्य होत नाही. परंतु या सगळ्या संकल्पनांना छेद देत त्यांनी देशातील डॉक्टरांना एकत्र आणून क्रीडा ऑलिंपिक आयोजित केले, ही अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेत स्वास्थ्यपूर्ण जीवनशैलीचे उदाहरण त्यांनी समाजा समोर ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर असणार्‍या काँग्रेसचे आमदार डॉ. विश्‍वजीत कदम यांना चिमटा काढताना डॉ. शिंदे म्हणाले की, सर्वाधिक स्पर्धा आणि मानसिक ताण हा राजकारणामध्ये असतो, असे म्हणत डॉ. विश्‍वजीत कदम यांच्याकडे पहात ते म्हणाले की, याआधी आम्ही एकत्र काम करायचो आणि आता वेगवेगळे काम सुरू आहे !! या त्यांच्या वाक्याने सभागृहामध्ये जोरदार हशा पिकला.

आमदार आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम यांनी या स्पर्धेचे कौतुक करताना म्हणाले की, या स्पर्धेत देशातून एक हजाराहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. या उद्घाटनाच्या वर्षीच त्यांनी सिक्सर मारलेला आहे. मी आणि भारती विद्यापीठ अशा उपक्रमांना नेहमीच पाठींबा देत आलो आहोत. पुढील वर्षी आयोजकांच्या मनात असले तर मी आणि भारती विद्यापीठ त्यांना निमंत्रण देत त्यांना सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी