Rinku Rajguru: सिनेसृष्टीत बऱ्याचशा अभिनेत्रींचा अभिनेत्यापेक्षांही मोठा चाहतावर्ग आहे. सैराट या मराठी चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा चाहतावर्गही गेल्या काही वर्षांत भरपूर वाढला आहे. रिंकूला आजवर बऱ्याचशा तरुणांचे प्रपोजलही आले आहेत. परंतु एका तरुणाने रिंकू ही चक्क मागील जन्मात त्याची पत्नी असल्याचा दावा केला होता. स्वत: रिंकूने याबाबत लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
नुकताच रिंकूचा ‘झिम्मा 2’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या निमित्ताने रिंकूने लोकमत फिल्मीच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये काही प्रश्नांची उत्तरं दिली. ‘तुला कुठल्या विचित्र चाहत्याचा काही अनुभव आलाय का?’ असा प्रश्न रिंकूला विचारण्यात आला होता. त्यावर रिंकूने एका चाहत्याविषयी सांगितलं.
“एक माणूस होता जो सातत्याने माझ्या घरी येत होता. आणि, फक्त घरी येत नव्हता तर तो सांगायचा की ही माझ्या मागच्या जन्मातली बायको आहे. तो सतत मला रुक्मिणी वगैरे अशा नावाने हाक मारायचा. त्यावेळी मी 17-18 वर्षांची असेल”, असं रिंकू म्हणाली.
पुढे ती म्हणते, “मी एका कार्यक्रमात गेले होते त्यावेळी सगळ्यांना पाहून मी हाय-हॅलो केलं. तर त्याचं म्हणणं होतं की, मी त्याच्याकडे पाहून हाय केलं आणि मी त्याच्या डोळ्यात पाहत होते. पण मला हे काहीच आठवत नाही. त्यानंतर मी ज्या इव्हेंटला जायचे तिकडे तो माणूस यायचा. घरीही यायचा आणि म्हणायचा की, ही देवीचा अवतार आहे. यात माझी रुक्मिणी मला दिसते. मागच्या जन्मात ती माझी बायको होती मग या जन्मात मला तिच्याशी लग्न करायचंय. तो सतत त्रास द्यायचा. हे खूप भितीदायक होतं.”
महत्वाच्या बातम्या-
“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”
दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी