धक्कादायक! २९ वर्षीय फुटबॉलपटूचा नदीत पोहायला गेल्यावर मगरीच्या हल्ल्यात दुर्देवी मृत्यू

Crocodile kills soccer player: कोस्टा रिकाचा फुटबॉलपटू अल्बर्टो लोपेझ आर्टिज (Alberto Lopez Ortiz) याच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. कोस्टा रिका येथील एका नदीत पोहोण्यासाठी गेल्यानंतर लोपेझवर मगरीने हल्ला केला. या हल्ल्यात २९ वर्षीय अल्बर्टोचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांना लोपेझचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी मगरीवर गोळीबार करावा लागला. लोपेझ क्लब डेपोर्टिवो रिओ कॅनासचा सदस्य होता. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सहकारी खेळाडूंनी लोपेझला श्रद्धांजली वाहिली आहे.

कोस्टा रिकाची राजधानी सॅन जोसपासून सुमारे १४० मैलांवर असलेल्या ग्वानाकास्ट प्रांतातील सांताक्रूझ शहराजवळ ही घटना घडली. लोपेझ नदीच्या काठावर व्यायाम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक त्याने पोहण्यासाठी कैनास नदीत उडी मारली. दरम्यान, एका मगरीने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. कैनास नदीत मगरी आहेत, त्यामुळे येथे पोहण्यासही बंदी आहे.

लोपेझ कोस्टा रिकन एसेन्सो लीगमध्ये डेपोर्टिव्हो रिओ कॅनास क्लब संघाकडून देखील खेळला आहे. टीमने फेसबुकवर लोपेझला श्रद्धांजली पोस्ट केली.