Ajit Pawar | लोकसभेचा पराभव विसरा, सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांना मागणी

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या निराशेचा सामना करावा लागला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात ४ पैकी रायगड लोकसभा मतदारसंघाची फक्त १ जागा जिंकता आली. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवाराना बारामती लोकसभा मतदारसंघातील पराभव सर्वात मोठी जखम देऊन गेला. कारण बारामतीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना हरवण्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवले होते. परंतु सुनेत्रा पवारांना मोठ्या मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

यानंतर आता लोकसभेतील पराभव विसरत सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापनदिनानिमित्त पुणे शहरातमध्ये शहराध्यक्ष दिपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती पाठवावं असा ठराव करण्यात आला.. या ठरावांमध्ये सुनेत्रा अजित पवार (Ajit Pawar) यांना राज्यसभेवर नियुक्त करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ व पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल.असं म्हणण्यात आले आहे. आता अजित पवार या ठरावावर काय प्रतिक्रिया देतात?, हे पाहावे लागणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!