मोदी सरकारने गोरगरीब जनतेला नेस्तनाबूत केलं, राष्ट्रवादीने काढली गॅस सिलेंडरची अंतयात्रा

पुणे:- गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेल तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत होत असलेल्या महंगाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर तसेच तेलाच्या डब्याची अंत्ययात्रा काढण्यात आंदोलन करण्यात आलं.यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

देशात 5 राज्यांच्या निवडणूक होत्या त्यामुळे पेट्रोल डिझेल यांचे दर स्थिर ठेवण्यात आले होते.पण जस या 5 राज्यांतील निवडणुका संपल्या तश्या पेट्रोल डिझेल तसेच गॅसच्या किमतीत वाढ समजली आहे तिला चार दिवसात तीन रूपये पेक्षा जास्त वाढ पेट्रोल डिझेल मध्ये झाली आहे, तर सिलेंडरच्या किमती 50 रुपये वाढ करण्यात आली आहे. लवकरात लवकर रद्द करावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

मोदी सरकारने या देशातील जनतेचं कंबरडे मोडण्याच काम केलं आहे. गोरगरीब जनतेला निस्तनाबूद करण्याचा काम मोदी सरकारने केलं आहे. 8 वर्षात मोदी सरकारने फक्त आणि फक्त महागाईत वाढ केली आहे. एकेकाळी 400 रुपयाला मिळणार गॅस आज 900 रुपयाला मिळत असल्याचे टीका यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे