उद्धव ठाकरेंचा धमाका : राष्ट्रवादी, भाजपला पाडले खिंडार; चिकटगांवकर, राठोड, भुमरेंनी बांधले शिवबंधन..

औरंगाबाद – वैजापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर (Bhausaheb Chikatgaonkar) यांनी अखेर हातातील घड्याळ काढून ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. चिकटगावकर यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

आज वैजापुरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, पैठण येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज हाती शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परिवारात स्वागत केले.

पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यशैलीवर टीका करत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर १५० हून अधिक गावात संपर्क करुन काेणत्या पक्षात जावे याची चापपणी केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करावे असे कार्यकर्त्यांनी सांगितल्याने शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

उद्धव ठाकरेंचा धमाका : राष्ट्रवादी, भाजपला पाडले खिंडार; चिकटगांवकर, भुमरेंनी बांधले शिवबंधन..

दरम्यान,  भाजपचे पैठणचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ पांडुरंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. वैजापूर, पैठण प्रमाणेच गंगापूर तालुक्यातील माजी सरपंच प्रदीप निरफळ यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला.