विकृतपणाची हद्द झाली; गाईचे पाय बांधून १६ वर्षीय तरुणाने केला अनैसर्गिक अत्याचार

पुणे – पुणे शहरातून एक अतिशय संतापजनक घटना उघडकीस आली आहे. हडपसर परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलाने मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार व्यक्ती हे पुण्यातील फुरसुंगी येथील कामठे आळी परिसरात राहतात. १३ डिसेंबरला घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जर्सी जातीची गाय बांधली होती. सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास १६ वर्षीय मुलगा त्याठिकाणी आला. त्याने गायीचे पाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक (Crime News) अत्याचार केला. दरम्यान, हडपसर पोलिसांनी १६ वर्षीय मुलावर भादवी कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलं आहे.