कोहलीपासून रोहितपर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे ‘हे’ खेळाडू आहेत शाकाहारी

भारतीय क्रिकेट संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. जागतिक क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी तंदुरुस्ती महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय संघाला हे चांगलेच समजते आणि ते टिकवण्यासाठी आमचे खेळाडू मैदानात आणि जिममध्ये घाम गाळतात.

आता फिटनेस हवा असेल तर चांगला आहारही महत्त्वाचा आहे. यासाठी अनेकजण विविध प्रकारचे आहार सुचवतात. मांसाहार करून फिट राहता येते असा अनेकांचा गैरसमज आहे. आज आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट संघातील अशाच काही क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत जे शाकाहारी असूनही तंदुरुस्त आहेत.

एक काळ असा होता जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आवडता पदार्थ बटर चिकन होता. पण 2018 मध्ये त्याने आरोग्याच्या कारणास्तव शाकाहारी होण्याचे निवडले आणि आजपर्यंत याचे पालन करत आहे. त्याची गणना केवळ भारतातच नाही तर जगातील फिट क्रिकेटपटूंमध्ये केली जाते.

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित हा एक मोठा खाण्याचा मोठा शौकीन आहे. असे असूनही तो शाकाहारीच आहे. कसोटीतील सर्वोत्तम फलंदाज चेतेश्वर पुजाराला सोया लाडू आवडतात. चेतेश्वर हा देखील शाकाहारी आहे.याशिवाय अष्टपैलू हार्दिक पंड्या अनेकदा दुखापतीचा बळी ठरतो. त्यामुळे त्याने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. आता योग्य व्यायामाने त्याचे खांदे आणि पाठीचा खालचा भाग खूप मजबूत झाला आहे.

इशांत शर्मा हा अंडर-19 संघात होईपर्यंत तो मांसाहारी होता. मात्र भारतीय संघात स्थान मिळवल्यानंतर तोही शाकाहारी जेवणाकडे वळला होता. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन लहानपणापासूनच शाकाहारी होता, पण मधल्या काळात त्याने पोषणासाठी अंडी आणि चिकन खाण्यास सुरुवात केली. आता त्याने हे सर्व खाणे बंद केले आहे.

शिखर धवनच्या फलंदाजीचे चाहते जगभरात आहेत. तो पूर्वी देखील मांसाहारी होता पण 2018 मध्ये तो शाकाहारी झाला. शिखरच्या म्हणण्यानुसार, त्याला मांसाहार फारसा आवडत नव्हता आणि नंतर जेव्हा त्याला त्याच्या नकारात्मक उर्जेबद्दल कळले तेव्हा त्याने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. मनीष पांडे टीम इंडियाच्या फिट क्रिकेटर्सपैकी एक आहे. त्याने विराट कोहलीचा यो-यो टेस्ट रेकॉर्ड मोडला. ते शाकाहारी देखील आहे.

भारतीय वेगवान गोलंदाज आणि स्विंग विशेषज्ञ भुवनेश्वर कुमार शाकाहारी कुटुंबातील आहे. त्यांनी लहानपणापासूनच शाकाहार स्वीकारला आहे. लेगस्पिनर युझवेंद्र चहल, त्याच्या इतर सहकाऱ्यांप्रमाणे, सुरुवातीला मांसाहारी होता. त्याला बटर चिकनही खूप आवडायचे. पण आता तो पूर्णपणे शाकाहारी झाला आहे. 2020 मध्ये त्यांनी याचा खुलासा केला होता.