हार्दिक पांड्याने आजीसोबत श्रीवल्ली गाण्यावर केला डान्स

अहमदाबाद – अहमदाबाद आयपीएल संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने बुधवारी इन्स्टाग्रामवर आपल्या आजीसोबत नाचतानाचा एक रील अपलोड केला. पंड्या कुटुंबातील दोन सदस्यांनी पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध श्रीवल्ली गाण्यावर नृत्य केले आहे.

हार्दिक पांड्याने त्याच्या आजीला ‘पुष्पा नानी’ असे संबोधले आहे आणि रीलच्या कॅप्शनमध्ये अल्लू अर्जुनला टॅग केले. त्यानंतर ही रील इंस्टाग्रामवर व्हायरल झाली असून, 30 मिनिटांत 500,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हार्दिकने पोस्ट केलेल्या डान्स व्हिडिओवर 3,500 हून अधिक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

श्रीवल्ली गाण्यावर नाचणारा पंड्या हा पहिला क्रिकेटर नाही. त्याच्याआधी सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो आणि राहुल चहर यांसारख्या खेळाडूंनीही नृत्य करतानाचे व्हिडिओ शेअर केले होते. बांगलादेश प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान काल रात्री ब्राव्होनेही डान्स केला आहे.